वार्ताहर/ हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन व संघटनेचा वर्धापनदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शिवाजी चौकातील शिवपुतळय़ासमोर दरवषीप्रमाणे महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष वैभव कदम यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन व अभिषेक घालण्यात आला. तसेच कोरोना या महामारीपासून सावधानता बाळगण्यासाठी जनजागृती करणाऱया आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी शिक्षिकांचा संघटनेच्यावतीने शाल, श्रीफळ व सेफ्टी मास्क देऊन सत्कार करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार सूचनांचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.