ऑनलाइन टीम / मुंबई :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच या भेटीनंतर मनसे आणि भाजपा एकत्र येतील अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ते म्हणाले, मनसेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. मनसे आणि भाजप यांच्या विचारांपेक्षाही ते त्या व्यक्तिंवर अवलंबून असते. त्यामुळे मनसेला भाजपाची भूमिका स्वीकृत असेल आणि संघाची व्यापक हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल असं मत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केलं आहे.