नवी दिल्ली
एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष आणि संचालक(सीएमडी) संजीव मेहता यांचे वार्षिक वेतन महामारीमुळे प्रभावीत झाले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ते 20.9 टक्क्यांनी कमी होत 16.36 कोटी रुपये राहिले आहे.
कंपनीने आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएमडींच्या एकूण वेतनात 11.19 कोटी रुपयाचे वेतन आणि भत्ते, 2.02 कोटी रुपयाचा बोनस,1.69 कोटी रुपयाचा अतिरिक्त लाभांश आणि भविष्य निधीमध्ये 44 लाख कोटी रुपयाच्या योगदानाचा समावेश झाला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मेहता यांचे एकूण उत्पन्न 19.42 कोटी रुपये होते. ज्यामध्ये 12.46 कोटी रुपये वेतन, 3.31 कोटी रुपये बोनस, 3.20 कोटी रुपयांचा लाभांश आणि भविष्य निधी तसेच अन्य 0.45 कोटी रुपयांच्या योगदानाचा समावेश आहे.