विविध डिटर्जंट पावडरसह साबणांचे भाव तेजीत
नवी दिल्ली
वाढत्या महागाईच्या झळा सुरु असताना सर्वसामान्यांना झटका बसण्याचे संकेत आहेत. देशातील दिग्गज एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) आवश्यक साहित्याच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने डिटर्जंट आणि साबण यांच्या किमती जवळपास 14 टक्क्यांनी वाढविल्या आहेत अशी माहिती कंपनीने दिली आहे.
व्हील डिटर्जंट पावडरचे भाव 3.5 टक्क्यांनी वाढले आहेत, म्हणजे 1 किलो पॅकेजसाठी ग्राहकांना 2 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. सर्फ एक्सेल डिटर्जंट पावडरची किमत 100 रुपयाहून वाढून 114 रुपये केली आहे.