शैलेंद्र वेलिंगकर यांचे प्रतिपादन, अंकित साळगांवकर यांना 20 ते 25 हिंदू संघटनांचा पाठींबा
प्रतिनिधी/ पणजी
महिला काँग्रेसची प्रतिमा कुतिन्हो यांनी गेल्या काही दिवसाआधी स्कूटरची अंत्ययात्रा काढली होती ती घटना अत्यंत निंदनीय आहे. हिंदू धर्म संस्कृतीच्या सहाय्याने चालत आहे. याची अवहेलना आम्ही सहन करु शकत नाही. कुतिन्होच्या विरोधात समाजसेवक अंकित साळगांवकर याने एफआयआर दाखल केले आहे. आणि अंकितच्या पाठींब्यात अजून 20 ते 25 हिदू संघटना आहेत. अशी माहीती शैलेंद्र वेलिंगकर यांनी दिली.
आझाद मैदान येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत अंकित साळगांवकर यांना पाठींबा देताना शैलेंद्र वेलिंगकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अंकित साळगांवकर, सुनिल सांतिनेझकर, विनायक मुंगरे, दिलीप झा, व मयुर दळवी उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव हे आम्हाला प्रतिमा कुतिन्होकडून शिकण्याची गरज नाही. खासकरुन गोव्यात हिंदू बहुसंख्या असल्यामुळे शांतीप्रिय भाग आहे. त्यामुळे अशाप्रकारची कृती करताना प्रतिमाने अनेकदा विचार करायला हवा. आतापर्यंत जी कलम प्रतिमावर लावण्यात आले आहे, त्यावर त्वरीत कारवाई होणे गरजेचे आहे. असे वेलिंगकर यांनी पुढे सांगितले.
गेल्या 5-6ग्न दिवसापूर्वी अंजुणा पोलिस स्थानकात प्रतिमा कुतिन्होविरोधात हिंदूच्या भावना दुखवल्यामुळे एफआयआर दाखल केली होती. नंतर हे फार्तोडा येथे पाहण्यात येत आहे. अटक होण्याच्या भितीने प्रतिमा कुतिन्हो मिडीयाच्या सहाय्याने पोलिसांवर दबाव हाडण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या प्रतिमा कुतिन्हो सांगते की आपणाला 90 टक्के लोकांनी पाठींबा दिला आहे. परंतु साध्यस्थिती अशी आहे की काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी देखील या घटनेसाठी पाठींबा दिला नाही आहे. असे अंकित साळगांवकर यांनी सांगितले.