बेळगाव/प्रतिनिधी
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार दि. 9 रोजी ‘हिंदू राष्ट्र जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरात वाहन फेरी काढण्यात आली. या फेरीस हिंदुत्वनि÷ आणि धर्मप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला. फेरीत भगवे ध्वज, भगवे फेटे तसेच हिंदुत्व जागृत करणाऱया घोषणा देण्यात येत होत्या. बॅ. नाथ पै सर्कल शहापूर येथून फेरीस प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी अनिल कुरणकर यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.
बॅ. नाथ पै सर्कल येथून खडेबाजार, सराफ गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, डॉ. एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, तानाजी गल्लीमार्गे टिळक चौक येथे या फेरीची सांगता झाली. समारोपप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे ऋषिकेश गुर्जर यांनी दि. 9 रोजी होणाऱया हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी हिंदूनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. याप्रसंगी सदानंद मसेकर, रोहण आगलावे, गोपाल हलगेकर, प्रकाश पवार यांच्यासह समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते..