लाहोर
पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत. बलुचिस्तानमधील लसबीला शहरात रविवारी रमेशलाल नंदलाल या हिंदू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. रमेशलाल हे कर्ज वसुलीसाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी जातीय कारण असल्याचा संशय व्यक्त करत कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.