वार्ताहर /शिवोली
दांडा शिवोली येथील हिंदू आणि ख्रिस्ती बांधवांचा प्रसिद्ध जागर आज सोमवार दि. 2 रोजी साजरा करण्यात होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा ः स. 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत श्री जागरेश्वर देवस्थानात भाविकांनी अपर्ण केलेल्या वस्तू स्विकारणे गाऱहाणे करणे, प्रार्थना करणे त्याचबरोबर धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. रात्री 12 वा. श्री जागरेश्वराच्या दोन्ही मांडावरून नाचत-गाजत दोन्ही स्वाऱया मंदिरात येईल व त्यानंतर आमच्या पारंपारिक जागर उत्सवास सुरुवात होईल. तसेच रात्री (सकाळी) 2 वा. “ही कोसली ईष्टागोत’ हा ’तियात्र’ सादर करण्यात येणार आहे. तरी आपण सर्व भाविकांनी / भक्तजनांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून श्री जागरेश्वर देवस्थानच्या जागर उत्सवाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती असे आवाहन श्री जागरेश्वर देवस्थान समितीने केले आहे.
तिथी नसलेला जागरोत्सव
गोव्यात काही ठिकाणी जागर साजरा केला जातो. त्या जागरोत्सवांना तिथी असते. पण दांडा शिवोली येथील जागरोत्सवाला तशी तिथी नसते. नाताळाच्या नंतर जो रविवार येतो त्या रविवारी शिवोली येथील प्रसिद्ध सेंट ऍन्थनी चर्चचे फेस्त साजरे केले जाते. त्याच्या दुसऱया दिवशी म्हणजे सोमवारी जागर साजरा केला जातो. पण जर सोमवारी येथील शिवोलकरांची ग्रामदेवता ‘श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव आला तर जागर त्याच्या दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवारी साजरा केला जातो.