ऑनलाईन टीम / श्रीनगर :
उत्तर काश्मीरमधील हंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबेदचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. सुरक्षा दलांनी या चकमकीदरम्यान एक एके 47 आणि चार मॅगझीन जप्त केली आहेत.
हिजबुल या दहशतवादी संघटनेचा मेहराजुद्दीन हा अत्यंत जुना दहशतवादी होता. दहशतवादाशी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. हंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तो ठार झाला. हंदवाडा पोलीस, 32 आरआर आणि 92 बीएन सीआरपीएफयांनी ही कारवाई केली.