ऑनलाईन टीम / मुंबई :
कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी आम्ही यावर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम आदेश देत शाळा-कॉलेजांतील हिजाबवरील बंदी कायम ठेवण्यास सांगितले. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कर्नाटकात काय घडतंय ते आम्ही पाहत आहोत आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनवू नये. आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. याचिकाकर्त्यांना या विषयावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायची आहे.