प्रतिनिधी/ बेळगाव
शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या हिडकल जलाशयामधून आणखीन 6 एमजीडी जादाचे पाणी उपसा करण्यासाठी नवीन विद्युत पंप बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आले आहे. याकरिता विद्युतीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे हे काम रखडले असून मे अखेर ऐवजी जून अखेरपर्यत शहराला जादाचा पाणी पुरवठा होण्याची शक्मयता आहे.
शहराची व्याप्ती वाढत असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही. राकसकोप आणि हिडकल जलाशयामधून पाणी उपसा करून शहरवासीयांची तहान भागविली जाते. दररोज 22 एमजीडी पाणी शहराला दोन्ही जलाशयामधून पुरवठा केला जातो. पण इतका पाणीपुरवठा शहरवासीयांसाठी अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून आणखीन 6 एमजीडी पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा मंडळाने केला आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हिडकल जलाशयामधून दररोज 9 ते 10 एमजीडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. हिडकल ते बेळगाव 56 कि. मी. चे अंतर असून, 3 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. ही योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी उपलब्ध निधीअंतर्गत ही योजना राबविण्यात आली होती. 18एमजीडी पाणी उपसा करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे आणखीन 6 एमजीडी जादाचे पाणी बेळगावकरीता आणण्यासाठी योजनेचा विस्तार केला जात आहे. हिडकल जलाशय, तुमरगुद्दी आणि कुंदरगी अशा तीन ठिकाणी असलेल्या विद्युत पंपांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकरिता 32 कोटीचा खर्च अपेक्षित असून, निविदा काढून कंत्राट देण्यात आले होते. यानुसार नवीन पंप तयार करून घेण्यात आले आहेत. महापालिकेकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने या योजनेचा विस्तार करण्याचे दोन वर्षापासून रखडले होते. मात्र फेब्रवारी महिन्यात हे काम सुरू करण्यात आले होते. पुणे येथील कंपनीकडून विशेष पंप तयार करून घेण्यात आले आहेत. हे पंप बेळगावात दाखल झाले असल्याने बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठय़ाची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. तसेच विद्युत पंप देखील बसविण्यास प्रारंभ करण्यात आल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यत काम पुर्ण होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे मे अखेरपर्यत शहराला हिडकल जलाशयामधून आणखीन 6 एमजीडी पाणी मिळणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे विद्युप पंप बसविण्याचे काम थांबविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. आता या कामास पुन्हा प्रारंभ करण्यात आल असून उर्वरीत कामे पुर्ण होण्यास महिन्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जूलै महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जून महिन्यात हिडकल जलाशयामधून जादाचे पाणी उपसा करण्यास प्रारंभ होण्याची शक्मयता आहे.