वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
हिडकल डॅम येथील शेतीचे रेकॉर्डरुम बेळगाव येथे हलवावे. शेतीबाबतची जी कागदपत्रे आहेत ती हिडकल येथील त्या रेकॉर्डरुममध्ये ठेवल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तेंव्हा तातडीने तेथील रेकॉर्डरुम सुवर्णसौधकडे हलवावे, अशी मागणी बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
बळ्ळारी नाला, तिगडी हरी नाला यासह इतर नाल्यांसाठी शेतकऱयांनी जमीन भूस्वाधीन केली आहे. त्याची कागदपत्रे हिडकल येथील रेकॉर्डरुममध्ये ठेवण्यात येतात. ती कागदपत्रे आणण्यासाठी हिडकलपर्यंत जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसाही वाया जातो. तेंव्हा तेथील रेकॉर्डरुम बेळगावला हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष गजानन पाटील, जनगरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, कमिटी सदस्य नितीन बी. गंगाई, ऍड. आर. बी. मिरजकर, ऍड. एस. सी. जैन, ऍड. ए. बी. खोत, ऍड. आर. एस. कामत, ऍड. डी. के. पाटील, ऍड. सुनील काकतकर यांच्यासह वकील उपस्थित होते.