ऑनलाईन टीम / शिमला :
आगामी 10 दिवसात हिमाचल प्रदेशातील 250 रुग्णांची प्रकृती सुधारणार, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर डी धिमान यांनी सांगितले की, या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. हे सर्वजण महाराष्ट्र आणि दिल्लीमधून हिमाचल प्रदेशात आले आहेत.
पुढे ते म्हणाले, बाहेरील राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या टेस्टची व्यवस्था चांगली नाही. खाजगी रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करण्यासाठी 2 हजार रुपये आकारले जातात पण हिमाचल प्रदेशमध्ये ही टेस्ट निःशुल्क केली जाते. आमच्या इथे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या घरी जाऊन त्याला ॲम्बुलन्स मध्ये घालून कोविड सेंटर आणले जाते. तसेच संशयित रुग्णास देखील निरीक्षणाखाली ठेवले जाते. पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेतला जातो. त्यामुळे येथील संख्या कमी होत आहे.
पुढे ते म्हणाले, हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या यामुळे वाढत आहे, कारण महाराष्ट्र, दिल्लीसारख्या ठिकाणी उपचारांची सुविधा चांगली नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेले रुग्ण हिमाचल प्रदेशात येत आहेत. या लोकांना आम्ही कोणाच्याही संपर्कात येऊ देत नाही. कोरोनाची बाधा झाली आहे हे निष्पन्न झाल्यावर संबंधितांना संस्थागत संस्थांमधून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करतो.