ऑनलाईन टीम / सोलन :
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील मुस्कान जिंदलने पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा यशस्वीरित्या पास होत हिमाचल प्रदेशचे नाव रोशन केले आहे.
यूपीएससी परीक्षेत मुस्कान जिंदल 87 वे स्थान प्राप्त केले आहे. 22 वर्षीय मुस्कान सोलन जिल्ह्यातील बद्दी गावात राहते. मुस्कानने खूप मेहनत घेत हे यश मिळवले आहे. तिने केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
मुस्कानचे वडील पवन जिंदल यांनी सांगितले की, माझ्या मुलीने बद्दी गावातील वी आर पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेतले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुस्कान 96 टक्के मार्क मिळवत शाळेत अव्वल आली होती.