ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या पत्नी संतोष शैलजा यांचे मंगळवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. शैलजा यांच्यावर हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यातील टांडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते.
एका मंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना केली आणि परिवाराचे सात्वन केले. शैलजा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, शांता कुमार यांच्या परिवारातील अन्य चार सदस्य, तसेच व्यक्तिगत सचिव, सुरक्षा अधिकारी आणि ड्रायव्हरला देखील कोरोनाची बाधा झाली होती.