ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील भाजी मंडईमध्ये सफरचंदाच्या सीझनसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. राज्य मार्केटिंग बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मंडईमध्ये सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
सफरचंदाच्या सीझनमध्ये मंडईमध्ये बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्डाने सरकारी आणि स्थानिक प्रशासनाला सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले होते. कारण देशात आणि हिमाचल प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच सफरचंदाच्या सीझनमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षी सफरचंदाच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे पोलीस आणि होमगार्ड यांसह अतिरिक्त जवानांची जरुरी भासत आहे.
दरम्यान, सद्य परिस्थितीत बोर्डा अंतर्गत येणाऱ्या मंडईमध्ये जवळपास चोवीस होमगार्ड मंडईमध्ये आपली सेवा देत आहेत. त्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे.
हिमाचल प्रदेश मार्केटिंग बोर्डाचे प्रबंध निर्देशक नरेश ठाकूर यांनी सांगितले की, बोर्डा अंतर्गत येणाऱ्या मंडईमध्ये सफरचंदाच्या सीजनमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होमगार्ड आणि पोलिसांच्या अतिरिक्त जवानांची व्यवस्था केली जात आहे. मंडई मधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मंडईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त जवानांची गरज भासत आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.