ऑनलाईन टीम / ऊना :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन केंद्रावर आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर ऊना रेल्वे स्टेशनवर देखील प्राध्यापकांना नियुक्त करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील ऊना उपमंडलात 50 अतिरिक्त प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण विभागातील प्राध्यापकांना कोविड संदर्भात रूपरेषाची माहिती देण्यासाठी ऊना मधील बचत भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपयुक्त संदीप कुमार होते.
उपायुक्त संदीप कुमार यांनी सांगितले की, कोरोना संकटाच्या सुरुवातीपासूनच राजस्व अधिकारी आंतरराज्यीय सीमांवर, क्वारंटाइन केंद्र आणि रेल्वे स्टेशनवर सेवा देत आले आहेत. आता हिमाचल प्रदेश सरकारने राजस्व कार्यालये खुले करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सर्व राजस्व अधिकाऱ्यांना या सेवेतून परत बोलावण्यात येत आहे, आणि त्यांच्या जागी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.
या बैठकीला एसडीएम डॉ. सुरेश जसवाल, सहायक आयुक्त डॉ. रेखा कुमार, तहसीलदार विजय राय, सीएमओ डॉ. रमण कुमार शर्मा, डीआरओ विद्याधर नेगी, एसडीएम हरोली गौरव चौधरी, सीडीपीओ कुलदीप दयाल आणि एएसपी विनोद कुमार धीमान आदी उपस्थित होते.