ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात आता कोणतीही व्यक्ती स्वतः ची कोरोना टेस्ट स्वतः करू शकणार आहेत. ही टेस्ट खाजगी लॅब एसआरएलमध्ये केवळ 700 रुपयांमध्ये करता येणार आहे. सध्या या लॅब ने जिल्हा कांगडा आणि मंडीमध्ये कोविड एंटीजन टेस्ट करण्याची खात्री दिली आहे.
सरकारने या लॅबला टेस्ट करण्यासाठी मशीन तयार करण्यास सांगितले आहेत. यामध्ये यूजर आयडी, पासवर्ड आणि लॉग इन आयडी आरोग्य विभगाचा असणार आहे. कारण टेस्टवर लक्ष ठेवण्यास आणि त्याची गुणवत्ता राखणे सहज शक्य होईल.
एसआर लॅब प्रदेशातील मोठ्या रुग्णालयात सुविधा देते. हिमाचल प्रदेशात सरकारकडून कोरोना रुग्णांच्या टेस्ट निःशुल्क केल्या जातील. ज्यांना वाटते आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, असे लोकं देखील आता खाजगी लॅबमध्ये टेस्ट करू शकतील. हिमाचल प्रदेशाव्यतिरिक्त अन्य राज्यात कोरोना टेस्टसाठी 2500 ते 3000 रुपये घेतले जातात.