ऑनलाईन टीम / चंबा :
हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 06 वाजून 25 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
भूकंपाचे केंद्र केवळ चंबा होते. प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असल्याची सूचना मिळाली नाही आहे. याआधी काही दिवसांपूर्वी बिलासपूरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते.