ऑनलाईन टीम / चंबा :
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. भरमौर पठाणकोट हायवे वरील अवघड वळण आणि शुंकु टपरीजवळील हनुमान मंदिराजवळ बोलेरो गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने 800 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. जखमींना भरमौर नागरिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर मेडिकल कॉलेज चंबामध्ये पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ठार झालेले सर्व जण चालक होते आणि ते लाहल येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून परत भरमौर येथे जात होते. एडीएम भरमौर पृथी पाल सिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या टीमला घटनास्थळी पाठवण्यात आले.
त्यांनी सांगितले की, त्यातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघांचा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर प्राण गेला. पोलिसांकडून अपघाता संदर्भात अधिक तपास सुरू आहे.