प्रतिनिधी/ संकेश्वर
येथील सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठीत हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निखिल कत्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच कारखान्यात झालेल्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर संचालकपदी बसवराज शंकर कल्लट्टी यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैलप्पा मगदूम यांनी अध्यक्ष व संचालकाचे अभिनंदन केले.
यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, शिवनाईक नाईक, बाबासाहेब आरभोळे, राजकुमार पाटील, उदयकुमार देसाई, शिवनाईक नाईक, सुरेश बेल्लद, व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, जयसिंग सनदी, कार्यालय अधीक्षक एस. आर. कर्कीनायक उपस्थित होते.