प्रतिनिधी/मुंबई
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थासमोर स्फोटकानी भरलेली स्कार्पीओ गाडी ज्या व्यक्तीच्या ताब्यात होती, त्या मनसुख]िहरेन याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱया राज्य एटीएसने हा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचे आदेश निघताच, दोघाना अटक केल्याने, एकच खळबळ माजली आहे. यामध्ये एका निलंबित पोलीस कर्मचाऱयाचा आण एका बुकीचा समावेश असल्याचे एटीएसने सांगितले.
तर, यामध्ये आणखी चार जणांचा समावेश असल्याचा संशय एटीएसला आहे. दरम्यान, याचा तपास करण्यासाठी एनआयएने देखील सुरुवात केली आहे. तर याप्रकरणामुळे पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यानी मुख्यमंत्र्याना पत्र ]िलहुन, यामध्ये गृहमंत्र्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील वातावरण ढवळुन निघाले आहे. मात्र मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी ठेवण्याचा कट हा जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच शिजला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन मफत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. यात बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. विनायक शिंदे हा माजी पोलीस कर्मचारी आहे.
विनायक शिंदे हा वारंवार सचिन वाझे यांना भेटायला येत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट शिजल्याचे समोर आले आहे. मे 2020 मध्ये विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. तब्बल वर्षभर विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेरच होता. फेब्रुवारी 2021 मध्ये विनायक शिंदे मुंबई पोलीस आयुक्तालयात आला होता. सचिन वाझे यांची त्याने भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन तास बैठक चालली होती. तसेच सचिन वाझेच्या कार्यालयात सुद्धा विनायक शिंदे भेटायला येत असल्याचे समोर आले आहे. विनायक शिंदेने सचिन वाझेच्या केबिन बाहेरील पोलिसांकडून पोलीस लोगोचे मास्क आणि पोलीस लिहलेली निळी पट्टी मागितल्याची माहिती अधिकृत सुत्रानी दिली. सचिन वाझेनंतर विनायकने मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका मोठÎा अधिकाऱयाची देखील भेट घेतली होती. तो वरीष्ठ अधिकारी कोण आहे? हे अद्याप समोर येऊ शकले नाही. तसेच, विनायक शिंदे आणि सचिन वाझेची ठाण्यातही भेट झाली होती. या कटामध्ये इतरही पोलीस अधिकाऱयांचा या कटात सहभाग आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
कोण आहे विनायक शिंदे ?
विनायक शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहे. लख्खन भैया बनावट चकमकीतील मुख्य आरोपी प्रदिप सुर्यवंशी याचा खास होता. बनावट चकमक प्रकरणी विनायक शिंदे याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली आहे. प्रदिप सुर्यवंशी, विनायक शिंदे हे सचिन वाझे याचे एकदम खास आहेत. सचिन वाझे याने प्रदीप सुर्यवंशी आणि विनायक शिंदे यांच्या सोबत अंधेरी युनिट मध्ये एकत्र काम केल्याचे समोर आले आहे. तावडे नावाने मनसुख हिरेन यांन फोन करणारा विनायक शिंदे असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे, सचिन वाझे याच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केल्याचा एटीएसला संशय आहे.