ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची कार आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी असलेले पोलीस अधिकारी सुनिल माने यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, काल मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील माने यांना अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंची मदत करण्याचा सहभाग आढळल्याने अटक करण्यात आली होती. काल एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनील माने यांना 28 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती काल एनआयएने न्यायालयात दिली होती.
दरम्यान, एनआयएच्या विशेष न्यायालयाने एनआयए कोठडी सूनवल्यानंतर अखेर आज सुनील माने यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय एनआयएला आहे.