प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील हिरेबागेवाडी हे गाव सध्या रेडझोनमध्ये आहे. या गावात एकूण 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या गावातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱयांबरोबरच इतर व्यवसायिकही अडचणीत सापडले आहेत. शनिवारी कर्नाटक परिवहचे राज्य व्यवस्थापक राजेंद्र चोळण यांनी भेट देवून येथील शेतकऱयांची समजूत काढली आहे.
हिरेबागेवाडी येथे 48 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 30 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर यापैकी एका 80 वषीय वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अजूनही 17 जण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती गंभीर आहे. या अनुषंगाने या गावातील शेतकऱयांना पेरणी तसेच इतर कामे करण्यासाठी बाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यामुळे राजेंद्र चोळण यांनी शेतकऱयांची भेट घेवून आणखी काही दिवस सबुरीने घ्या, असा सल्ला दिला आहे.
सध्या पेरणीचे हंगाम येवून ठेपले आहे. वर्षभर याच पिकावर शेतकरी अवलंबून असतात. मात्र हिरेबागेवाडी हे गाव रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे या गावात निर्बंध अजूनही सुरुच आहेत. कोणत्याही गावकऱयांनी गावाबाहेर पडू नये, असे आवाहन राजेंद्र चोळण यांनी केले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सबुरीने घेण्याची गरज असल्याचेमतही त्यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर इतर अधिकाऱयांनीही शेतकरी व गावकऱयांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, अधिकारी के. व्ही. राजेंद्र, पोलीस आयुक्त एस. बी. लोकेशकुमार, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.