प्रतिनिधी / बेळगाव
हिरेबागेवाडी येथील आणखी एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या 23 वषीय तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून जिल्हयातील बाधितांची संख्या 73 वर पोहचली आहे.
शनिवारी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तुमकूर, विजापूर येथील प्रत्येकी 2, बिदर, बेळगाव, जमखंडी व बेंगळूर शहर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. हिरेबागेवाडी येथील बाधितांची संख्या 37 वर पोहचली आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 598 वर पोहचली आहे.