बेळगाव येथील निराश्रित पुनर्वसन केंद्रात केले दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
हिरेबागेवाडी येथील एक निराधार निराश्रित मनोरुग्ण व्यक्ती दयनीय अवस्थेत जीवन जगत असल्याचा फोन सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांना आला. ही व्यक्ती रस्त्यावर मिळालेले अन्न खाणे व तेथेच झोपणे असे करीत होती.
वीरेश यांनी त्वरित तेथे जाऊन बेळगाव येथील निराश्रित पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधला व त्या मनोरुग्णाला आणून केंद्रात दाखल केले. याबद्दल हिरेबागेवाडी येथील नागरिकांनी वीरेश व कार्यकर्त्यांचे आभार मानले. वीरेश यांना सिद्धू हुक्केरी, नीळकंठ पार्वती, तम्मण्णा गाणगी, आनंद पाटील यांचे सहकार्य लाभले.