वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हिरोमोटो कॉर्पने भारतीय बाजारात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मास्ट्रो एज 125 स्कूटरचे सादरीकरण केले आहे. या नव्या गाडीत एलइडी हेडलॅम्प, पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटय़ूथ कनेक्टिव्हिटी विथ कॉल अलर्ट, टर्न नेव्हिगेशन अशा सुविधा असणार आहेत. याच्या ड्रम मॉडेलची एक्स शोरुम किमत 72,250 रुपये आणि डिस्क मॉडेलची एक्स शोरुम किमत 79,750 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. विक्री विभागाचे कंपनीचे मुख्य नवीन चौहान यांनी यानिमित्त बोलताना, स्कूटर्सच्या मागणीत बऱयापैकी वाढ राहिली असून ग्राहकांचा कल पाहूनच कंपनीने आपली नवी मास्ट्रो एज स्कूटर सादर केली असल्याचे म्हटले आहे. आधुनिक काळाला अनुसरून ही गाडी सादर केली असून युवकांचा विचार करून गाडीचे डिझाइन केले गेले आहे, असेही त्यांनी सांगितले. यातील ड्रम प्रकारातील गाडी कँडी ब्लेझिंग रेड, पँथर ब्लॅक, पर्ल सिल्वर व्हाइट आणि मॅट टेक्नो ब्लू या चार रंगात येणार असून डिस्क प्रकारातील गाडी वरील चार रंगासह प्रिस्मॅटीक यलो व प्रिस्मॅटीक पर्पल या 6 रंगात उपलब्ध होणार आहे.