कंपनीचा दावा : 10 वर्षांपेक्षा अधिक बॅटरी चालणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून देशासह जगभरातील वाहन बाजारात वाहन खरेदीचा कल बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये विविध कंपन्या आपल्या मजबूत बॅटरीची क्षमता असणाऱया गाडय़ा बाजारात आणत असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या स्पर्धेत हिरो इलेक्ट्रिक कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 15 मिनिटात पूर्ण चार्ज करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर काम करत असल्याची माहिती आहे. या तंत्रज्ञानाची एक नवी गाडीही लवकरच सादर केली जाण्याचे संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत.
या करीता हिरोने बेंगळूर येथील 9 कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. हिरो लॉग 9 चा इंस्टा चार्जिग रॅपिडएक्स बॅटरी पॅकचा वापर करणार आहे. यावर कंपनीने दावा केला आहे, की जवळपास लॉग 9 बॅटरीच्या मदतीने हिरो इलेक्ट्रिक स्कूटरला 15 मिनिटात पूर्ण चार्ज करता येऊ शकता येणार आहे.
लॉग 9 इंस्टा चार्जिग बॅटरी पॅक फास्ट चार्जिंग बॅटरी लवकर समाप्त होणार नाही यासोबतच सदरची बॅटरी ही 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत चालणार असल्याचे नमूद केले आहे. रॅपिडएक्स बॅटरींचा वापर -30 अंश ते 60 अंश से तापमानात करण्यात येणार आहे. या बॅटरीला सेफ्टी फिचर्सची जोड आहे. जी आग लागण्यापासून व तापमान सुरक्षित ठेवण्यासाठीही मदत करणार असल्याची माहिती आहे.