गुरगाव
दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या नव्या एक्सपल्स 200 या मोटारसायकलचे बुकिंग सुरू केले आहे. सदरची गाडी आगाऊ बुक करण्यासाठी इच्छुकांना 10 हजार रुपये भरावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.पहिल्या टप्प्यातील बुकिंग फुल्ल झाल्यानंतर आता दुसऱयांदा बुकिंग खुले करण्यात आले असून गाडीची किंमत 1 लाख 30 हजार 150 रुपये (एक्स शारूम -दिल्ली) राहणार आहे.