मुंबई
हिरोमोटो कॉर्पची बीएस-6 शेणीवर आधारीत मास्टरो एज 110 ही नवी दुचाकी भारतीय बाजारात दाखल झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गाडीची प्रतिक्षा केली जात होती. दोन प्रकारात असणाऱया या गाडीची किंमत 60 हजार 950 रुपये आणि 62हजार 450 रुपये इतकी असणार आहे. बीएस 6 चे इंजिन या गाडीला असून या खेरीज इतरही वैशिष्टय़े यात असणार आहेत. बाहेरील बाजुने इंधनाची टाकी असून मोबाईल चार्जिंग पोर्ट, सिटच्या खाली स्टोरेजची जागा यात आहे. मुख्य समोरच्या दिव्यासाठी हॅलोजन दिवा आहे तर टेललाइट एलइडीयुक्त आहे. मिडनाइट ब्ल्यू आणि सील सिल्वर या दोन नव्या रंगात ही गाडी उपलब्ध होणार आहे. 110 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन याला असून 1 हजार 843 एमएम लांबी, 715 एमएम रूंदी आणि 1 हजार 188 एमएम उंची आहे.