नवी दिल्ली
दुचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून हिरोमोटो कॉर्पची ओळख आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. यामध्ये कंपनीच्या गाडय़ांची एकूण विक्री 5,76,957 युनिट झाली आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये 3,34,647 दुचाकांची विक्री झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाहन उद्योगात कोरोना महामारीच्या संकटाच्या प्रभावाने मोठय़ा प्रमाणात वाहन कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले होते. परंतु लॉकडाऊनमधील शिथिलता आणि कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या मदतीने वाहन क्षेत्र काही प्रमाणात सावरत गेल्याची नेंद करण्यात आली आहे. ग्राहकांनी मात्र दुचाकी खरेदीला चांगला प्रतिसाद नोंदवल्याने हिरोमोटोची विक्री विक्रमी पातळीवर पोहचली आहे.