वृत्तसंस्था/ बेंगळूर
बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेससोबत इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील कंपनी हिरो इलेक्ट्रिकने नुकतीच भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकीसाठी याअंतर्गत उभयतांकडून कर्जाची सोय करण्यात येणार आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून हिरो इलेक्ट्रिक आपल्या वाहनांच्या खरेदीकरीता एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून अर्थसहाय्य ग्राहकांना पुरवणार आहे. झंजटमुक्त कर्ज प्रक्रिया असणार असून त्याचप्रमाणे कमीत-कमी कागदपत्रे इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीसाठी ग्राहकांना द्यावी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
700 विक्रित्यांकडे उपलब्ध वित्तसेवा
देशभरातील सातशेहून अधिक विपेत्यांकडे सदरच्या वित्त सेवेमार्फत वाहन कर्ज सहाय्याची योजना उपलब्ध असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. आकर्षक व्याजदर, सुटसुटीत परतफेडीचा कालावधी आणि परवडणाऱया इएमआयाचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.