नवी दिल्ली
इलेक्ट्रीक गाडय़ांच्या बाजारात हिरो इलेक्ट्रिकने नुकतीच आपली नवी एनवायएक्स-एचएक्स ही सुधारित इलेक्ट्रिक स्कूटर दाखल केली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही गाडी 210 कि. मी. चे अंतर कापते. अनेक वर्षे या गाडीची चाचणी करून संशोधनातून निर्मिती करण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या स्कुटरची सुरुवातीची किंमत 63 हजार 990 रुपये आहे. व्यावसायिक वापराच्या कारणास्तव ही गाडी मजबूत बनवली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.