यूएसबी चार्जर, कॉलसह एसएमएस सुविधा मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने भारतामध्ये नवीन स्कूटर डेस्टिनी 125 एक्सटीइसी सादर केली आहे. सदरच्या स्कूटरला एलइडी हेडलँप, ऍडव्हान्स रेट्रो डिझाईन आणि क्रोम एलिमेंटसोबत बाजारात दाखल केले आहे. नवीन नेक्सस ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
यामध्ये एसटीडी मॉडेलची किमत एक्स शोरुम किमत 69,900 रुपये तर डेस्टिनी 125 एक्सटीइसीची एक्स शोरुम किमत 79,990 रुपयापासून सुरु होणार आहे. आमची गाडी नव्या फिचरसोबत बाजारात दाखल होत असून ग्राहकांच्या पसंतीला उतरणार असल्याचा विश्वास कंपनीच्या अधिकाऱयांनी यावेळी व्यक्त केला आहे.