किंमतीत नाममात्र वाढ,3 मॉडेल्स उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱया दुचाकीपैकी स्प्लेंडर प्लस या मोटारसायकलची किंमत काहीशा प्रमाणात वाढविली आहे. स्प्लेंडरच्या बीएस 6 प्रणालीच्या 3 मॉडेल्स असून कंपनीने तिन्ही मॉडेलच्या किमती 750 रुपयांनी वाढवल्या आहेत.
सदरच्या मोटासायकलची किमत 59,600 रुपये होती, यांच्या आता बेस मॉडेलची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 60,350 रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये किक स्टार्ट, अलॉय व्हील, सेल्फ स्टार्ट, ड्रम बेक आणि सेल्फ स्टार्टच्या सोयी आहेत. हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकीच्या इंजिनची क्षमता 97.2 सीसी आहे. तसेच बीएस 6 प्रणालीवर आधारीत इंधन इंजेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.