वृत्तसंस्था/ गुरगाव
दुचाकी निर्मितीतील कंपनी हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक दुचाकींचा वाढता खप लक्षात घेऊन केलेली ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकताच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत भागिदारी करण्याचे निश्चित केले आहे. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग केंद्रासह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही भागीदारी केली गेली आहे. येणाऱया काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरणार असल्यामुळे चार्जिंग केंद्रांची सोय महत्त्वाची ठरणार आहे. जेणेकरून इलेक्ट्रिक दुचाकीधारकांना आपल्या वाहनांचे चार्जिंग करता येणे शक्मय होणार आहे