ऑनलाईन टीम / मुंबई :
हिरे मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आज सकाळी आयकर विभागाने छापे टाकले. सकाळपासून या ठिकाणांवर आयकर विभागाचे अधिकारी झडती घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्पने आपल्या खर्चामध्ये बनावट बिले दाखविल्याचा संशय आयकर अधिकाऱ्यांना आहे. आयकर विभागाच्या पथकाला जे संशयास्पद खर्च सापडले आहेत, त्यामधील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी आयकर विभागाने मुंजाल यांच्या निवासस्थानी आणि मुख्य कार्यालयांवर छापेमारी केली. या ठिकाणांवर सध्या सर्च ऑपरेश सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंर हिरो मोटोकॉपर्सच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.