लुधियाना
पंजाबचे उद्योगमंत्री सुंदर श्याम अरोडा यांनी हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या कारखान्याचे नुकतेच उद्घाटन केले आहे. सदरचा हा कारखाना शहरापासून धनानसु गावामध्ये हायटेक सायकल व्हॅलीमध्ये उभारण्यात आला आहे. या अगोदरच्या मंत्र्यांनी चंदीगढ मार्गाने सायकल व्हॅलीला जोडणाऱया 8.5 किलोमीटर लांब आणि 100 फूट चौफेर असणाऱया रस्त्याचे उद्घाटन केले होते.
हिरोचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी यावेळी म्हटले आहे, की युरोपमध्ये संशोधन आणि विकासाच्या सुविधेसह भारतामध्ये पुनर्निमाणसोबत सायकल निर्मितीत महत्त्वाचे योगदान देण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.
नवीन कारखान्याच्या माध्यमातून भारतासाठी प्रीमियम सायकल आणि ई-सायकलिंग क्षेत्रात जागतिक पातळीवरील केंद्र करण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कारखान्यामध्ये उत्पादन क्षमता वर्षाला 1 कोटी इतकी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.