मध्यप्रदेशातील पन्ना हा भूभाग हिऱयांच्या खाणींसाठी इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे. तसेच येथे भूमीवर घनदाट वनही आहे. जमिनीखाली काही फूट खोदल्यास हिरे सापडतात, असा अनुभव काही जणांना येथे आला आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक लोक आता या भागात येत असून त्यामुळे वृक्षांवर कुऱहाड कोसळली आहे. मोठय़ा प्रमाणावर वृक्ष मुळासकट तोडून तेथे हिरे शोधण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत, असे खड्डे खोदण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यात 20 हजार वृक्षांची अशी कत्तल करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या पाच दिवसात अवघे 15 हिरे मिळाल्याची नोंद आहे. पण मूठभर हिरे मिळविण्यासाठी हजारो वृक्षांची तोड करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. हिऱयांमुळे मिळणाऱया धनापेक्षा पर्यावरण संरक्षणातून होणारा लाभ नेहमीच कितीतरी पटीने अधिक असतो पण झटपट श्रीमंत होण्याच्या वेडाने झपाटलेले काही लोक वृक्षांवर क्रोध दाखवून हिऱयांचा शोध घेत आहेत.
आता मध्यप्रदेश सरकारने अशा प्रकारच्या हिऱयांच्या शोधावर बंदी घालण्यासाठी पावले टाकली आहेत. झाडे तोडून हिरे शोधणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण संरक्षक आणि वृक्षप्रेमींनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यानुसार लवकरच पावले उचलली जातील, अशी शक्यता आहे.