ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची नवीन सहा लक्षणे आता समोर आली आहेत. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोनाची नवीन सहा लक्षणे जाहीर केली आहेत.
कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या लक्षणात सहा नवीन घटकांचाही आरोग्य विभागाने विचार करावा, असे सिडीसीने म्हटले आहे. या नवीन लक्षणांमध्ये थंडी वाजणे, थंडी वाजून अंग शहारणे, डोकेदुखी, चव किंवा स्वास संवेदना जाणे,
स्नायुदुखीचा समावेश आहे. यापूर्वी कोरोना लक्षणांमध्ये ताप, कफ, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे, अशी लक्षणे दिसत होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून पुढील 14 दिवसात ही लक्षणे दिसतात. चेहरा व ओठ निळसर दिसणे, उठून बसता न येणे, ही देखील लक्षणे आढळतात. कोरोनाच्या संसर्गात सौम्य व तीव्र प्रकारात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात, असे सीडीसीचे मत आहे.