ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात 16 लाख नागरिकांना लस देण्यात आली तर आत्तापर्यंत 70 लाख नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या मागील चार आठड्यापासून कमी होताना दिसत आहे. मात्र, जागतिक स्तरावरची माहिती घेतल्यास जगात दररोज 5 ते 6 लाखांच्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्मयाची सूचना आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण काळजी घेतोय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी केली जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या भागातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार पवार बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सध्या आपल्या भागात 898 कोविड लसीकरण केंद्र आणि खासगी 400 केंद्र आहेत पुणे जिल्हा आणि तालुक्मयांमध्ये किमान एक तरी ऑक्सिजन प्लॅट तयार करण्याचे काम सुरु आहे. यासोबतच मागिल महिन्यात 16 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, वेळोवेळी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास निश्चित आकड्यापर्यंत लवकरच पोहचू, असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
- आधी 2 डोस, मग बुस्टर डोसचा विचार
लसीकरण करताना पहील्यांदा दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाईल. लसीच्या बूस्टर डोससाठी माझीही सहमती आहे. पण आधी लसीचे दोन डोस पूर्ण केले जातील त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
- डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले
पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीवर जिल्हाप्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष असून गरज लागल्यास निर्जंतुकीकरण आणि इतर उपाययोजना केल्या जातील.