सीईएन विभागाची कारवाई ः सव्वादोन किलो गांजा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
टिपुसुलताननगर हुंचेनहट्टीजवळ गांजा विकणाऱया एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सीईएन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून 2 किलो 125 ग्रॅम गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
हुंचेनहट्टीजवळील एका शिक्षण संस्थेनजीक गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून राहुल बसवराज सुतार (वय 20, रा. जयनगर, मच्छे) याला अटक केली.
गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेली केए 22 एचजे 6930 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गांजाची किंमत 31 हजार 875 रुपये इतकी होते. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या राहुलवर कर्नाटक अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासकरून शिक्षण संस्थांजवळ अमलीपदार्थ विकणाऱयांच्या मुसक्मया आवळण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली असून विद्यार्थ्यांना नशेबाज बनविणाऱया गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.