वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार उपकरण बनविणारी चीनची कंपनी हुआईने भारतीय बाजारात क्लाउडवर आधारीत कंटेंट डिलिवरी नेटवर्क (सीडीएन) सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने दावा केला आहे, की हीच सेवा येत्या काळात जवळपास 130 देशांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले आहे.
सदरच्या सेवेतून देशातील व्यापाऱयांना चांगल्या प्रकारच्या वेबशी संबंधीत काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञानातील क्षेत्रावर ग्राहकांचा विश्वास, सुरक्षा आणि कायमची सेवा देण्याच्या 30 वर्षाच्या अनुभवाचा फायदा आगामी काळातही देता येणार असल्याचा मला खूप आनंद होत असल्याचे हुआईचे अध्यक्ष स्टीव किम (क्लाउड)यांनी म्हटले आहे.