भारतामधील कमाईचा समावेश : 50 टक्क्मयांपर्यंत कपात शक्मय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यातील मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमेवरील तणावाचे पडसाद आता दोन्ही देशांमधील व्यापारावर होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या कारणामुळे भारताने चीनच्या जवळपास 59 ऍप्सवर बंदी लावली असून अन्य निर्यातीवरही प्रतिबंध लावण्याची शक्मयता आहे. अलिबाबासारख्या चिनी कंपन्या भारतात कर्मचारी कपात करण्यासोबतच विविध प्रकल्प बंद करण्याकडे वळल्या आहेत.
आता चीनची अशीच एक दूरसंचार कंपनी हुआई आगामी काळात भारतामधील नफा कमाईचे ध्येय 50 टक्क्मयांनी घटविण्याचा विचार करत असून भारतात कर्मचारी कपात करण्याचा निर्णयही कंपनीकडून घेण्यात आला आहे. माध्यमाच्या अहवालानुसार हुआईने 2020 मध्ये महसूल कमाईचे ध्येय बदलून 300 ते 500 दशलक्ष डॉलर केले आहे. या अगोदर मात्र कंपनीने हाच अंदाज 700 ते 800 दशलक्ष डॉलर इतका निश्चित केला होता.
दूरसंचार कंपन्यांना नवीन निर्देश
सीमा संघर्षानंतर भारत सरकारने सर्व सरकारी दूरसंचार कंपन्यांना आपले 4 जी नेटवर्क उभारणीसह विस्तार करण्यासाठी चीनच्या उत्पादनांऐवजी देशातील उत्पादने वापरण्याचे निर्देश भारत सरकारकडून नुकतेच दिले आहेत. परंतु यावर हुआई कंपनीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रया दिली नसल्याची माहिती आहे.
कर्मचारी कपातीचे पाऊल
हुआईने भारतामधील कर्मचाऱयांची 60 ते 70 टक्क्मयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्लोबल सर्व्हिस सेंटर रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट विंगमधील कर्मचारी कपात करण्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्मयता आहे.