वार्ताहर/ हुक्केरी
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशानुसार शनिवार दि. 18 पासून दोन रस्ते सोडून सर्वच रस्ते सीलडाऊन करण्यात आल्याची माहिती पीएसआय शिवानंद गुडगनट्टी यांनी दिली. ते जुन्या नगरसभा कार्यालयासमोर आयोजित शहरातील व्यापाऱयांच्या बैठकीत बोलत होते.
गुडगनट्टी म्हणाले, बेळगाव मार्गे येणाऱया अडविसिद्धेश्वर व कोर्ट सर्कल रस्ता मात्र उघडा ठेवण्यात आला आहे. मात्र येथे पोलीस बंदोबस्त राहणार असून केवळ पासधारकांना सोडण्यात येईल. उर्वरीत हुक्केरी शहराला जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. किराणा व्यापाऱयांनी सकाळी 8 ते 11 पर्यंतच दुकान उघडावे असे सांगून, ग्राहक व व्यापारी दोघांनी मास्कचा वापर करावा, अशी सूचना दिली. नगर परिषद मुख्याधिकारी मोहन जाधव यांनी व्यापाऱयांना यापुढे वाढीव दराने वस्तू विकत असल्याचे आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.