विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाईक
वार्ताहर/ हुक्केरी
जानेवारी 1 पासून 23 एप्रिलपर्यंत मास्क न घालणाऱयांवर दंडात्मक कारवाई करताना हुक्केरी तालुक्यात 1 लाख 33 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सीपीआय रमेश छायागोळ यांनी दिली.
हुक्केरी पोलीस स्थानक व्याप्तीत 705 प्रकरणातून 70 हजार 500 रुपये, 22 तारखेला 129 प्रकरणात 16 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच संकेश्वर पोलीस स्थानकातून 3055 मास्क प्रकरणातून 35 हजार 500 रुपये व 22 तारखेला 50 प्रकरणातून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकातून 278 प्रकरणातून 27 हजार 800 रुपये तर 22 तारखेला 20 प्रकरणातून 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 1 लाख 33 हजार 800 रुपये तर 22 तारखेला 23 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.