प्रतिनिधी / बेळगाव
हुक्केरी गुरुशांतेश्वर मठाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णावाहिका देण्यात आली. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर शुवाचार्य स्वामीजी, आमदार अनिल बेनके, मुख्यमंत्र्याचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विरेश हिरेमठ आदी उपस्थित होते. बुडा कार्यालयाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ, चंदू बागेवाडी, बी. व्ही. हिरेमठ, राचय्या हिरेमठ, बी. एस. हिरेमठ, अमित मुंगरवाडे आदींनी सदर रुग्णवाहिका मठाला दिली होती. मठाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.