प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरातील हुतात्मा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली मारुती गल्ली रामदेव गल्ली येथील व्यापाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कै सुरेश अंगडी याना श्रद्धांजली वाहिली.कै अंगडी यांनी आपल्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात रामदेव गल्ली येथूनच केली होती.तेव्हापासूनच ते हुतात्मा चौक गणेश मंडळ व येथील व्यापारी वर्गाशी संलग्न होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार , बाळसाहेब काकतकर , विश्वनाथ हंडे, रामकुमार जोशी ,हेमंत सूर्यवंशी ,अशोक कलबुर्गी , अशोक नाईक, अमोल बेदरे ओमप्रकाश राजगुरू , राव बहादूर कदम, श्रीकांत पाटील , तानाजी भेकने, मारुती कांबळे रिक्षा चालक व व्यापारी बंधू उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व मंडळातर्फे श्रद्धांजली सेक्रेटरी शिवाजी हंडे यांनी वाहिली तर बाळासाहेब काकतकर यांनी आपल्या श्रद्धांजली भाषणात लोकनेत्याचा अस्त असा उल्लेख केला.