बेळगाव/प्रतिनिधी
74 व्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या हुतात्मा चौक मंडळातर्फ़े कार्यक्रम पत्रिका व फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे मंडळाने दिढ दिवसाचा सण येथील रामदेव गल्लीमधील राममंदिरात साजरा करण्याचे यापूर्वीच निश्चित केले आहे. नीटनेटकेपणा ने उत्सव साजरा करावा या उद्देशाने मंडळाने श्री मूर्तीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे सर्व कार्यक्रमाचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी खडे बाजार पोलीस स्टेशनचे धीरज शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते.
यावेळी बोलताना त्यांनी मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिननंदन केले. प्रारंभी शिवाजी हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अशोक पोतदार यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी अशोक कलबुर्गी, रामकुमार जोशी, शाम सुतार, राजकुमार कलघटगी, शेखर हंडे, गोपाळ पुरोहित, बापू सुर्यवंशी, चंदू कोलकर, तानाजी भेकने, रिक्षा चालक व व्यापारी उपस्तीत होते.