हुपरी/प्रतिनिधी
येथील नगरपरिषद कार्यालयातील जबाबदार अधिकारी व पाणी पुरवठा विभागातील एक कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून नगरपरिषदेत कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकच खळबळ माजली आहे.
चालू आठवड्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी कमी होत असल्यामुळे दिलासा दिलासा मिळाला होता. पण कोरोना रुग्णांबरोबरच आज अखेर पर्यँत मृत्यूंची संख्यादेखील वाढली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 360 झाली असून 299 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. परिसरातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे .हुपरी शहरातील अनेक भागात कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत हा परिसर नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करून बाधीत झालेला भाग सील करण्यात येत आहे.